Friday, December 9, 2011

फ़क्त हा माझा भास आहे........


Thursday, November 3, 2011

उशिरा समजले माला


तू माझी अन मी तुझा
किती मस्त मेळ होता........
उशिरा समजले माला
हा तुझा एक खेळ होता
रचिले स्वप्न सुखि संसाराचे मी......
निर्मळ प्रेमळ स्वप्नातील संसार माझा
उशिरा समजले माला
उध्वस्त करण्याचा तुझा डाव होता.........
तू माझी अन मी तुझा
किती मस्त मेळ होता.........
मनं माझे विरहाच्या अग्निमध्ये
आजही जळत आहे
उशिरा समजले माला
अग्निमध्ये ढकलण्याचाच तुझा बेत होता........
जे झाले ते झाले
गेलिस जरी सोडुन मला
माझ्या आठवणिंना कशी सोडशील.......
जेंव्हा त्या सतवतील तेंव्हा
कळेल तुला.
तुझ्याचं बरोबर शेवट करण्याचा
माझा विचार होता...........



मोहन : ४-११-२०११

Friday, October 21, 2011

जीवनाची शिवण उसवण्याआधी ये..


किती दिवस असा राग धरणार माझ्यावर
किती अबोला धरणार आहेस
माझे प्रेम खरे की खोटे
हे आता मीचं समजु शकत नाहि........
पण....
माफ़ कर मला मी तुला समजु शकलो नाही
मला तुझी आठ्वण येतेय
तु मला बंद डोळ्याने दीसतेस
रात्र निघुन चालली आहे...
पहाट उगवतीला येत आहे
तुझ्या आठवणि वाढंत चालल्या आहे...........
तहानलेली धरती आकाशाकडे पाहत आहे........

किती दिवस असा राग धरणार माझ्यावर
किती अबोला धरणार आहेस......
हे जगचं क्षणभंगुर झाले आहे
तसा तुझा सहवासही..........
अजूनही माझ वेडं मन गाणं गातं ..
स्वप्नं रंगवत, तुझ्या आठवणींत स्वःताला हरवून बसतं ..
पण तू नाहीच बोललीस तर ..
या वेड्या मनाची समजूत कशी काढू मी ?
असे विचार मनात आल्यावर ,
डोळे पाणावतात , स्वप्नांची असंख्य शकले होतात..
सांग ना सखे
किती दिवस असा राग धरणार माझ्यावर
किती अबोला धरणार आहेस......
माझ्या मनाचा बांध तुटायच्या आधी ये..
अन उरात धडपडणारे श्वास थांबण्याआधी ये,
जीवनाची शिवण उसवण्याआधी ये..
लवकर ये..
मि तुझी वाट पाहत आहे...................

Tuesday, October 4, 2011

कसे सांगु तुला माझे तुझ्यावर आजही प्रेम आहे.........


कसे सांगु तुला माझे तुझ्यावर आजही प्रेम आहे.........
विसरुन सगळे मनाचे घाव
आजही तुझ्याच साठी जगत आहे
कसे सांगु तुला माझे तुझ्यावर आजही प्रेम आहे........
मरुन सुदधा "जिवंत" उभा आहे
तु जिथे सोडलेस त्याच जागी
तुझी वाट बघत उभा आहे
कसे सांगु तुला माझे तुझ्यावर आजही प्रेम आहे.........
हात कधी हातात येतील हे वाटलच नव्हतं,
हातातले हात सुटतील हेही वाटलच नव्हतं.
मला वाटतंय मी जगेन आता फार,
पण मला वाटतंय तसं होतंय कुठे.
कसे सांगु तुला माझे तुझ्यावर आजही प्रेम आहे.......
पूर्वी हसायला काहीही कारणं चालायची,
आता कारण असून सुद्धा हसत नाही.
कसे सांगु तुला माझे तुझ्यावर आजही प्रेम आहे.......
तुझ्यावर आजही प्रेम आहे.......
तुझ्यावर आजही प्रेम आहे.......

मोहन ०५/१०/२०११

Wednesday, September 28, 2011

आलिस परत कि पुन्हा जावु नकोस............


दरवेळी भेटायला येतांना
तुझा बहाणा नवा असतो...
तू परत जाताना
जीव माझा क्षणो-क्षणी तुटतो.
येताना मात्र निवांत येतेस
पण जातानाचं तुला का घाई होते........
तुला काय माहित
तुझी वाट पाहताना मला काय होते......

किती? वाट बघावी तुझया या चाहुलीची,
नको बघू अंत आता माझया आशेची.
दूर दूर राहून वेडापिसा झालो आहे,
सहन नाही होत,
तुझया प्रेमात वेडा झालो आहे.
प्रत्येक पाउली तूच असावी,
अशी इच्छा आहे आता.
तू परत जाताना
जीव माझा क्षणो-क्षणी तुटतो.

डोळे मिटून तूच दिसते,
डोळे उघडून पण तुझीच आस असते.
जेव्हा माझी पापणी लावते,
त्याक्षणी तु इथे नसल्याची
जाणीव होते.
तू परत जाताना
जीव माझा क्षणो-क्षणी तुटतो.
आता फ़क्त एकचं आस आहे
आलिस परत कि पुन्हा जावु नकोस............

Tuesday, April 26, 2011


"धुंद सुगंध"


जेंव्हा तु माझि होतिस
तेंव्हा एक वेगळीच धुंद होति............
तेंव्हा एक वेगळाच सुगंध होता.........
काय दिवस होते ते
तु मझि आणि मि तुझा
स्वपनात तु मनात तु ध्यानात तु
जिकडे पहावे तिकडे तुच तु आणि तुच तु..........
तेंव्हा एक वेगळीच धुंद होति............
तेंव्हा एक वेगळाच सुगंध होता.........
जगत होतो वेगळ्याच दुनियेत
वेगळ्याच धुंदित...... वेगळ्याच मस्तीत.........
पण आज काळाने
धुंदी उतरवलि आणि सत्य दाखविले
सत्य समजल्यावर धुंदि हि गेलि आणि सुगंध हि गेला
कारण आज तु मझि नाहिस
पण तरीहि आज थोडिशि धुंदि आहे ..............
पण तरीहि आज थोडासा सुगंध आहे..............
वाट पाह्तोय सखे तुझ्या परतिचि
सांग ना सखे परतुन तु येशिल का?
येउन मजला मिठित घेशिल का?????
कारण
आज थोडिशि धुंदि बाकि आहे ..............
आज थोडासा सुगंधहि बाकि आहे..............

मोहन बाराथे २३-११-२०१०

दोन जीवाना जगू द्या



काय हा समाज काय ह्यांच्या रुढी
अरे ह्या समाजाने तिला माझ्या पासुन हिरावुन घेतलंय
काय गुन्हा होता आमचा
प्रेम होतं ते गुन्हा न्हवता
आहो काय सांगु
दोन सोनेरी पाखरं होतो आम्हि
पण ह्या समाजामुळे
लपवित लक्तरे आयुष्याची चालत आहे मी ....
तिच्यासाठी होतो अन अजूनही तिच्यासाठीच राहिल..
असाच जगत आहे मी.....असाच जगत राहिल
नामशेष होऊन ही...
म्हणुन सांगतो
प्रेम करा आणि प्रेम करु दया
दोन जीवाना जगू द्या

मोहन बाराथे २२-११-२०१०

मनमोकळं हसायचीही भिती


काय करु आता मि
मनमोकळं हसायचीही भिती
असणारंच ना कारण
केले होते प्रेम तुझ्यावर जगाचा विचार न करता
सोड्ले होते घर दार मी तुझ्यासाठी
तोड्ले होते सगळे नाते संबंध मी तुझ्यासाठी
वाट्लं होत तु असाविस माझि आणि फ़क्त माझि
होतिसहि माझि तु
पण वरच्या मनाने
मला काय माहित कि तु माझ्या नव्हे
तुझ्या घरच्यांचा आणि समाजाचा पहिला विचार करशिल
आणि सोडुन जाशिल
आज सगळे जग हसतेय रे माझ्यावर
काय करु आता मि
मनमोकळं हसायचीही भिती
आणि रडायचीहि भिती



मोहन बाराथे २०-११-२०१०

हृदयाची धड-धड .....तो आवाज



हृदयाची धड-धड .....तो आवाज .....फक्त तुझा
भास होतोय ................
खरं सांग तुझाचं आहे ना.........................
कसं समजावु वेड्या मना
गेलिस तु सोडुन ह्रुदय माझे लाथाडुन .................
तु आजहि नाहिस आणि उद्याहि नसशिल...........
प्रेम तुला माझे ना कळ्ले कधि
कळलि ना भाषा माझ्या डोळ्यांची....................
पण काय करणार
हृदयाची धड-धड .....
तो आवाज .....
भास होतोय कि फक्त तुझाच आहे...............
फक्त तुझाच आहे....................
तुझाच आहे................


मोहन बाराथे १९-११-२०१०

मन हे वेडे आहे रे



तुझ्या त्या गुलाबी ओठांच्या पाकळ्या
आजहि आहेत माझ्या नजरे समोर
कि ज्यांनी मनं भरुन शब्द उच्चारले होते कि
माझं तुझ्यावर खुप खुप प्रेम आहे
तुझ्या साठि मी काहिहि करेन
घर काय मी जग सोडेन
पण ना तु त्या शब्दाला जागलिस
ना तु त्या वचनाला पाळलेस
आजहि एकटाच आहे
वाट पाह्तोय तुझि आणि
तुझे ते शब्द पुर्ण होण्याची
पण नाहि ते शक्य नाहि
मन हे वेडे आहे रे
तुझ्या त्या गुलाबी ओठांचे दिवाने आहे रे

मोहन बाराथे १९-११-२०१०

रात्रिच्या काळोखात




रात्रिच्या काळोखात
कोणितरी भट्कत होतं
कोणालातरी शोधत होतं
जिला शोधत होतं
तिला ते माहित होतं
पण का कुणास ठाउक
मि असताना हि मला सतावत होतं
आणि
मि नसताना हि मला सतावत आहे
असो तिचि ति सवयंच आहे
पण तरीही
रात्रिच्या काळोखात
कोणितरी भट्कत होतं
कोणालातरी शोधत होतं
दुसरं तिसरं कोणि न्हवतं
अगं वेडे रात्रिच्या काळोखात भट्कणारा माझं ते प्रेम आणि आत्मा होता


मोहन बाराथे १८/११/२०१०

तू फक्त माझी आहेस



एक सांगतो सखे
आज जरी तु माझि नाहिस..........
आज जरी तुझ्या नि माझ्यात दुरावा आहे.........
तरी तू फक्त माझी आहेस
आज जरी तुझे शरीर मज जवळ नाहि.........
पण तुझे ते निरागस मनं
माझ्या जवळ आहे.......
ते निर्मळ प्रेम
माझ्या जवळ आहे........
म्हणुन तू फक्त माझी आहेस...........
तुझे ते रुप मझ्या मनात कोरंलेल आहे
तुझे ते हास्य मला आजहि हसवत आहे
माझ्या मनात तुझ्या मनाने
एक घर केलंल आहे
म्हणुन पुन्हा एकदा सांगतो
तू फक्त माझी आहेस
आणि माझिच राहशिल..............
माझिच राहशिल..........

मोहन बाराथे २५-११-२०१०

माझ्यीया प्रियेला प्रीत कळेना



माझ्यीया प्रियेला प्रीत कळेना
आता कसं सांगु तिला.....
आता कसं समजावु तिला.......
खुप प्रेम करतोय गं तुझ्यावर....
तुजविन मि अपुर्ण......
तुजविन माझे जग अपुर्ण.....
तुझ्यासाठि काहिहि करेल.....
तुझ्यासाठि जगहि सोडेल......
पण
माझ्यीया प्रियेला प्रीत कळेना
कितिदा समजावु तिला
घे समजुन ह्या वेड्या जिवा
घे उमजुन ह्या वेड्या मना.........
समजुन का न समझल्या सारखे करतेस.......
खुप खुप प्रेम करतोय गं तुझ्यावर
नको सोडुन जाउस मला....
नको सोडुन जाउस मला.....
पण
माझ्यीया प्रियेला प्रीत कळेना.................
माझ्यीया प्रियेला प्रीत कळेना...................


मोहन बाराथे २५-११-२०१०


कोणितरी असावे



मलाही वाटत होतं
कोणितरी असावे प्रेम करणारे ............
कोणितरी असावे आयुष्यभर साथ देणारे..........
आलि जरी आसवे डोळ्यांमधे...........
कोणितरी असावे पुसणारे.........
आणि अचानक का पण कोण जाणे.......
आयुष्याच्या एका वळणावर ति भेटलिही
पण मला जशि हवी होती ती तशी न्हवती
तरीहि मनाला म्हणालो
आज ती तशि नहिये पण तुझ्या प्रेमाने ति बदलेल
पण नाहि तसे झाले नाहि...............
आणि आज तिही नाहि...................
आणि आज मला पुन्हा वाटतं
कोणितरी असावे..........
कोणितरी असावे.............




मोहन बाराथे २७-११-२०१०

माझ्या प्रेमावर दोन फुलं वाहीन म्हणतो.......


माझ्या प्रेमावर दोन फुलं वाहीन म्हणतो.......




माझ्या प्रेमावर दोन फुलं वाहीन म्हणतो............
माझ्या प्रेमावर दोन फुलं वाहीन म्हणतो............
दोन का अगदी चार पाच वाहिनं म्हणतो...
काय करु.... कसे करु .... कसे फ़ुलं वाहु
मनं ते जड झालंय------
आणि हातंही जड झालेत-------
माझ्या प्रेमावर दोन फुलं वाहीन म्हणतो............
दोन का अगदी चार पाच वाहिनं म्हणतो...
पण ते शक्य नाहि
अरे माझ्या कडुन ते शक्य नाही........
ते फ़क्त तुलाचं जमलं..........
मला ते शक्य नाही...........
कारण
आजही माझं मन शोधतंय रे तुला ह्या आसमंतात .....
वेडं आहे रे ते
आकाश पालथं घातलं, धरती पालथीं घातली............
खुप शोधंल खुप शोधंल
आणि अजुनहि शोधतंय............




मोहन बाराथे २७-११-२०१०

माझं थोडंतरी ऎकुन घे ना.......



खुप खुप विनवनी केली तिला.....
का निघालीस ?............जरा थांब ना ......
माझं थोडंतरी ऎकुन घे ना........
पण नाहि ति काहि थांबलि नाहि आणि
ऎकुनही घेतलं नाहि.................
ति वेडी होती मला एकट्याला सोडुन गेलि
ति तर नाहि थांबलि पण ......
तिचि सावलि सोडुन गेली......
दुःख फ़क्त इतक्याचं गोष्टीचं आहे
डोळ्यांनी वचन दिलं होतं
आणि शब्दांनि तोडुन गेलि.........
इच्छा ना माझि कधि पुर्ण झाली
इच्छेलाच माझि आस बनवुन गेली.........
खुप खुप विनवनी केली तिला.....
का निघालीस ?............जरा थांब ना ......
माझं थोडंतरी ऎकुन घे ना........
पण नाहि ति काहि थांबलि नाहि आणि
ऎकुनही घेतलं नाहि.................
अपुऱ्या पडणाऱ्या श्वासांनीही        
तेव्हा समजावलं तिला ..
नको धावूस दूर जाण्या मझ्यापासून ..          
उलट घे जाणून मला तू जवळून ........
खुप खुप विनवनी केली तिला.....
का निघालीस ?............जरा थांब ना ......
माझं थोडंतरी ऎकुन घे ना........
पण नाहि ति काहि थांबलि नाहि आणि
ऎकुनही घेतलं नाहि.................



मोहन बाराथे ३०-११-२०१०

चंद्र तिथला आणि इथला सारखाच आहे



चंद्र तिथला आणि इथला सारखाच आहे
फ़रक फ़क्त इतकाचं आहे
त्या चंद्राजवळ चांदणी आहे......
कीति नशिबवान आहे तो
त्याच्या जवळ त्याचि चांदणी आहे.........
आणि
ह्या चंद्राची चांदणी हरवली आहे.......
माझि चांदणी कशी हरवलि कुणास ठावुक....
किती तरी रात्रि गेल्या आठवणित......
ऎका कडेला उभा राहुन मी
रोज नभ पहात होतो..........
सम्पुर्ण नभ फीरुन परत मी
तीथेच उभा रहात होतो..........
बराच वेळ गेला
हे असंच चालु राहीलं
शेवटी हा चंद्र शांत झाला
त्या नभाला पाहु लागला..........
आणि पाहतो तर काय.....
तो चद्र ह्याला हसु लागला........
हसणारचं त्या चंद्राजवळ त्याची चांदणी आहे......
आणि
ह्या चंद्राची चांदणी हरवली आहे.......
पण तरीहि
चंद्र तिथला आणि इथला सारखाच आहे
फ़रक फ़क्त इतकाचं आहे
त्या चंद्राजवळ स्वताः चे ढग आहे.........
ह्या चंद्राजवळ सिगारेट चे ढग आहे......
चंद्र तिथला आणि इथला सारखाच आहे..................
चंद्र तिथला आणि इथला सारखाच आहे.......................



मोहन बाराथे ०१-१२-२०१०

सखे मला तुझ्याविना करमेना......



सखे मला तुझ्याविना करमेना......
सखे मला तुझ्याविना जगवेना......
का असं केलंस......... का तसं केलंस.....
मन माझे तुला समजले नाही???
प्रेम माझे तुला उमगले नाही?????............
सखे मला तुझ्याविना करमेना......
सखे मला तुझ्याविना जगवेना......
तुजवीन मला रोजचा दिवसच काय
पण रात्रही खायला उठते...............
काय होते ते दिवसं ज्यात
तु-मि आणि ति बाग होती.......
काय होते ते दिवसं ज्यात
तु-मि आणि ते नेहमीचे थिएटर होते.......
काय होते ते दिवसं ज्यात
तु-मि आणि माझि बाइक होती.......
काय होते ते दिवसं ज्यात
तु-मि आणि ते आपलेचं जग होते.......
ज्यात फ़क्त तु आणि मि होतो......
आणि आजचे हे दिवसं ज्यात
तु नाहि फ़क्त मि आहे..........
का विसरलीसं तु इतक्यात...
तुच सांग आत मला
प्रेम असतं तरी कसं.........आणि
प्रेम नसतं तरी कसं......
तुच सांग वेडे प्रेम असतं तरी कसं
प्रेम नसतं तरी कसं..........
अरे खरचं सांगतोय तुला
सखे मला तुझ्याविना करमेना......
सखे मला तुझ्याविना जगवेना......
तुझि मि मरेपर्यंत वाट पाहत राहील.......



मोहन बाराथे ०२-१२-२०१0



कन्फ़ुयज झालिस?????
का होतीय धड धड.......?
कुठला आवाज आहे........?
कुणाचा आवाज आहे.........?
कुठुन येतोय ..........?
अगं वेडे
ती धड धड नव्हे माझ्या प्रेमाची चाहुल आहे.........
अगं वेडे
तो आवाज मी साद घातलेला आहे...........
अगं वेडे
तो आवाज माझाचं आहे..........
अगं वेडे
तो दुसरी तिसरी कडुन नव्हे.....
तुझ्या ह्रुदयातिल आहे......
आणि तो
हृदयातला आवाज ............म्हणजेच मी आहे
मी तुझ्यात
तुझ्यातिल भावनांचा........
भावनातिल मनांचा.........
मनातिल शब्दांचा........
शब्दातिल लहरींचा.......
लहरीतिल अस्तित्वांचा.......
आवाज ............म्हणजेच मी आहे
आता तरी ये
माझ्या शिवाय तु आणि तुझ्या शिवाय मि जगु शकत नाहि.....
आता तरी हे मान्य कर..............
तुझ्या ह्रुदयातला आवाज म्हणजे मी आहे.............
आणि माझ्या ह्रुदयातला आवाज म्हण्जे तु आहे...........


मोहन बाराथे  ०४-१२-२०१०

सांग माझ्यासाठि काय काय केलं



तुझ्यासाठी काय सांगु काय काय केले?
अरे
तुझ्यासाठी मी आकाश पाताळ ऎक केले.....
तुला रोज बघणं
आयुष्यातील एक सवय बनली होती.......
संध्याकाळ माझी विरत चालली होती......
तुझ्या हास्यात मी पुर्ण बुडायचो...
आपल्या प्रेमाच्या रोपट्याला जिवापाड जपायचो....
मनाला मोहवणार्या प्रत्येक गोष्टीत तुझंच प्रतिबिंब होतं.......
तु दिसली नाहिस तर
संपुर्ण आभाळ डोळ्यात उतरायचं
मला घरी जाताना चिंब चिंब भिजवायच....
अरे तुझ्यासाठि मि पुरता वेडा झालतो
जर तु माझ्यावर प्रेम केलंस तर तुला हे सर्व माहीत हव होतं...........
तु मला हे विचारायला नको होतं
सांग माझ्यासाठि काय काय केलं
आता अजुन काय सांगु
तुझ्यासाठी काय काय केले
तुझ्यासाठी काय काय केले


मोहन बाराथे  ०६-१२-२०१०





जाणवली आज ती गुलाबी थंडी.........
लागली चाहुल तु असण्याची..........
काही वेळ स्तब्ध थांबलो आणि 
जाणवले तो एक भास..... तु असण्याचा....
इतक्यात तुझ्या श्वासांचा सुगंध आला....
दरवळत माझ्या आवती-भोवती फ़िरत राहीला...
खुप खुप आठवणी घेवुन आला.....
मग डोळे जरा मिटुन पाहिले....
सरलेल्या क्षण आठ्वुन पाहिले....
त्या आठवणीत चांदण्या सा-या मोजुन पाहील्या....
चांदण्या रात्रित घेतलेल्या शपथेचा शब्द न शब्द आठवून पाहिला......
तुझ्या श्वासांचा सुगंध आला....
दरवळत माझ्या आवती-भोवती फ़िरत राहीला.....
मग त्या आठवणित नदि किनारी जाउन बसलो
कित्येकदा किना-याला मिठित घेतले...आणि 
परतना-या लाटेला निराशेने पाहीले......
ऎक हंबरडा फ़ोडला.......
तुला साद घातली....
माझ्या आवती - भोवती फ़िरणारं
तुझ अस्तित्व जाणवलं
तुझ्या श्वासांचा सुगंध आला....
दरवळत माझ्या आवती-भोवतीच फ़िरत राहीली..




मोहन बाराथे ०७-१२-२०१०

वाट्लं होतं... मला सावरायला तुच येशिल.....




वाट्लं होतं
तुझं माझ्यावर प्रेम असेलं.......
मला हवा असलेला प्रत्येक अर्थ तुझ्या कॄतीत दिसत होता.....
तुझ्या शिवाय जीवन माझे व्यर्थ होते.....
मला एक खात्री होती
जेंव्हा मी एकटा असेल....
सोबत कुणीही नसेल....
तेंव्हा मला सावरायला तुच येशिल......
वाटंल होतं
जेंव्हा माझ्या जखमा भिजण्यासाठी आतुर होतील...
तुझ्या आश्रुंना नवी वाट मिळेल------
तेंव्हा मला सावरायला तुच येशिल......
पण एक दिवस माझ्या काळजाचा ठोका चुकला......
जेंव्हा मला तुझा मी पणा दिसला......
तेंव्हा वेडापीसा झालो होतो मी...
तुझ्या आठवणीत
किनारा दिसत असूनही
पाण्यात गटांगळ्या खात होतो मी.........
तुझ्या आठवणीत
चितेशिवाय सरणावर चढलो होतो मी......
तेंव्हा वाटले की
मला सावरायला तुच येशिल......
पण तु आलि नाहिस.......
पण तु आलि नाहिस.......
आणि तु सावरलं नाहिस...



मोहन बाराथे =====> ८-१२-२०१०

आयुष्य गेले वाया


आयुष्य गेले वाया







आयुष्य गेले वाया
सखे तुझ्या आणी फ़क्त तुझ्याच आठवणीत...
आकाशीचा तो चंद्र आणि त्याचि चांदणि पाहून
तुझीच आठवण दटुन येते.........
तुला विसरण्याचा मी 
खुप प्रयत्न करतोय.....
पण न राहून 
सारखी का गं तुच आठवतेय......
आयुष्य गेले वाया
सखे तुझ्या आणी फ़क्त तुझ्याच आठवणीत...
परतु नकोस तु पुन्हा 
जुन्या आठवणी जागवायला.........
आधिचं आयुष्य संपलंय
ह्रुदयावरील जखमा भरायला.......
आयुष्य गेले वाया
सखे तुझ्या आणी फ़क्त तुझ्याच आठवणीत...........
पुन्हा आयुष्यात परतू नकोस तू
तुझे स्थान मिळवायला,
आधिचं आयुष्य संपलंय
त्या सर्व आठवणी विसरायला........


मोहन बाराथे =====१४-१२-२०१०

सांग ना तु परतुन य़ेशील?



का गेलीस तु दुरदेशी.....
तुला माहित आहे........
माझि काय दुर्दशा झाली आहे.....
आज हे जग मला.....
प्रेमवेडा म्हणुन हिणवत आहे........
आज हे जग माझ्यावर
हसत आहे......
का गेलीस तु दुरदेशी...........
अरे तु गेलीस दुरदेशी...
असं समजु नकोस
तुझं भाग्य आहे.........
पण....
विरह आला नशिबी.....
माझं दुर्भाग्य आहे...........
का गेलीस दुरदेशी.....
तु सोबत रहावी म्हणुन....
आठवण ठेवली आहे.......
त्या आठवणीत फ़क्त
आस तु येण्याची बाकी आहे..................
सांग ना तु परतुन य़ेशील?????????
तु पुन्हा माझि आणि
फ़क्त माझिचं राहशील??????????



मोहन बाराथे.===>१८-१२-२०१०

सर्व काही लपवावं लागतं...............


म्हणतात ना 
हे जीवन सुंदर आहे.........
पण ह्या सुंदर जीवनामध्ये 
सर्व काही लपवावं लागतं...............
मन कितीही रडंत असलं 
तरी ह्या निर्दयी जगासमोर
हसावं लागतं..........
ह्याचं सुंदर जीवनात
नाती तशी भरपुर आहेत....
पण ती जपणारी लोकं खुप कमी आहेत.....
काही रक्ताची
तर काही ह्रुदयाची ................
काही असतात दुरुन 
आपलं म्हनणारी.........
तर काही जवळुन 
दुरावा करणारी...............
काही असतात
प्रेमाने आपलंस करणारी
तर काही आपलं असुन नसणारी.......
काही असतात
न जोडता जुळणारी
तर काही असतात
जोडुन सुदधा तुटनारी......
म्हणुन म्हणतात ना.....
हे जीवन सुंदर आहे.........
पण ह्या सुंदर जीवनामध्ये 
सर्व काही लपवावं लागतं...............
मन कितीही रडंत असलं 
तरी ह्या निर्दयी जगासमोर

मोहन बाराथे =====२४-१२-२०१

सखे ये परत माघारी








सखे ये परत माघारी
नाही मी म्हणणार नाही.......
तुझा झालो तेंव्हाच 
संपलो मि माझ्यासाठी.......
तुझ्याशिवाय श्वास घेइल असे
स्वप्नही पडले नाही कधी.......
सखे ये परत माघारी
नाही मी म्हणणार नाही.......
जग सजवावं तुझ्यासाठि
म्हणुन सर्व करत होतो........
जमिनीवर उभे राहुन 
तारे तोडत होतो.............
सखे ये परत माघारी
नाही मी म्हणणार नाही.......
मन माझं वेडं आहे रे
फ़ुलाचा गंध आवडला म्हणुन 
फ़ुल मागतोय...........
सखे ये परत माघारी...............
सखे ये परत माघारी..............
सखे ये परत माघारी..................


मोहन बाराथे======२८-१२-२०१०





अशाच एका सांज वेळी
तु होतीस ती वेळ..............
आणि आज ही वेळ आहे..............
आजच्या सांज वेळी .................तु नाहिस.......
आणि मि एकटा पडलो आहे.........


तुला माहीत आहे?
मी एकटा पडलो आहे.........
माझ्या मनात काय काय आहे........
पण तुला ते कळनार कसे .....
तु तिकडे आणि मी इकडे आहे............


पण आजंही मन माझं
तुज जवळ आहे.................
शक्य असेल तर परत ये............. कारण
मि एकटा पडलो आहे.......... आणि
ढळलेली सांज मनात
काहूर उडवून देत आहे..........
मन वेड्या पक्षासारखे
रात्रीला आधार शोधु पाहत आहे.............


अशाच एका सांज वेळी
तु होतीस ती वेळ..............
आणि आज ही वेळ आहे..............
आजच्या सांज वेळी .................तु नाहिस.......
आणि मि एकटा पडलो आहे...........


येशील ना परत????????????????
मी तुझी वाट पाहत आहे...............
मी तुझी वाट पाहत आहे...............
मी तुझी वाट पाहत आहे...............




मोहन बाराथे=======०६-०१-२०१