Tuesday, April 26, 2011


सांग माझ्यासाठि काय काय केलं



तुझ्यासाठी काय सांगु काय काय केले?
अरे
तुझ्यासाठी मी आकाश पाताळ ऎक केले.....
तुला रोज बघणं
आयुष्यातील एक सवय बनली होती.......
संध्याकाळ माझी विरत चालली होती......
तुझ्या हास्यात मी पुर्ण बुडायचो...
आपल्या प्रेमाच्या रोपट्याला जिवापाड जपायचो....
मनाला मोहवणार्या प्रत्येक गोष्टीत तुझंच प्रतिबिंब होतं.......
तु दिसली नाहिस तर
संपुर्ण आभाळ डोळ्यात उतरायचं
मला घरी जाताना चिंब चिंब भिजवायच....
अरे तुझ्यासाठि मि पुरता वेडा झालतो
जर तु माझ्यावर प्रेम केलंस तर तुला हे सर्व माहीत हव होतं...........
तु मला हे विचारायला नको होतं
सांग माझ्यासाठि काय काय केलं
आता अजुन काय सांगु
तुझ्यासाठी काय काय केले
तुझ्यासाठी काय काय केले


मोहन बाराथे  ०६-१२-२०१०

No comments:

Post a Comment