Monday, May 27, 2013

आठवणीतही तुझ्या मग पुन्हा मी रमून जातो

 
तुझ्याशी बोलताना
हरवून जातो स्वतःला
वाटत मनाला
जर का नसता हा दुरावा

तुझ्याशी बोलताना
आठवणीतही तुझ्या मग
पुन्हा मी रमून जातो
बघता बघता सकाळची ती सांज होते
आठवणीतही तुझ्या मग
पुन्हा मी रमून जातो

दुरावा तुझ्या माझ्या मधला
मनात एक काहूर उडवून जातो
दुराव्यात पण का मी
पुन्हा माझाच जगतो
आठवणीतही तुझ्या मग
पुन्हा मी रमून जातो

आस लागली सये
आता तुझ्या मिलनाची
साकारतील का स्वप्ने माझ्या मनाची ?
माहित आहे मला शक्य नाही ते
ठरवलेस तू तर अशक्य हि नाही ते
विचार करून
आठवणीतही तुझ्या मग
पुन्हा मी रमून जातो

भेटशील का एकदा
मन तुझे सावरून
काढशील का मला बाहेर
आठवणींच्या जगातून

मोहन - २८-०५-२०१३ वेळ - आताच

Thursday, May 23, 2013

एकटेपणा येतो तेंव्हा


एकटेपणा येतो तेंव्हा
तो असा येतो कि
जसे वाळवंटातले वादळ
येताना एकटा येतो
आणि जाताना सर्व काही घेवून जातो
सोडून जातो फक्त त्या आठवणी
मनाला बोचणार्या, मनाला छेडणार्या
मनाला असह्य वेदना देणाऱ्या
एकटेपण येतो तेंव्हा असा येतो कि
अथांग समुद्रावर पसरलेली धुक्यांची चादर
समोर सर्वकाही असताना काहीच न दिसणारा
एकटेपण येतो तेंव्हा असा येतो कि
उरतो फक्त भास
ती जवळ असण्याचा
होतो फक्त त्रास
ती सोडून गेल्याचा
एकटेपण येतो तेंव्हा असा येतो कि
देतो फक्त दुखाचे सावट ......
फक्त दुखाचे सावट........
दुखाचे सावट........

मोहन :- २३-०५-२०१३ वेळ : आताच

Monday, May 20, 2013

एक कुतूहल ती येण्याच .........



 











 एक कुतूहल ती येण्याच .........
आज ती एक महिन्या नंतर येणार होती
खूप खुश होतो कारण एक महिना ती न्हवती
तिच्याशी बोलायला मन खूप आतुर झाले होते
कारण एक कुतूहल ती येण्याच ............
आणि आज तो दिवस आला
ती आज मला ओन्लायीन भेटणार
मग आम्ही खूप खूप गप्पा मारणार
कारण एक कुतूहल ती येण्याच ............
मनात तर इतके प्रश्न होते कि विचारायला नको
कधी आलीस ?
काय काय केलेस महिनाभर ?
मला एक तरी फोन/मेसेज का नाही केलास ?
माझी आठवण आली का?
असे खूप काही प्रश्न
कारण एक कुतूहल ती येण्याच ............
पण ..................
आज ती आली आणि .........
हाय बाय इतकेच ?????
कसा आहेस हा देखील प्रश्न नाही !!!
चल जाते बाय नंतर बोलू खूप काम आहे
असे बोलून निघूनही गेली
एखादा भरलेला फिश टयांक
कोणी दगड मारून मारून फोडावा
तसा खळळळळळ करून तुटलो
त्या पाण्यासोबत मनातील सर्व प्रश्न वाहून गेले
राहिलो पुन्हा एकटाच
कारण एक कुतूहल ती येण्याच ............
नसतच तुटल मन माझ
जर का मी इतकी ती येण्याची आस लावलीच नसती
वेडाच होतो मी माहीतच न्हवत 
ओन्लायीन मैत्री फक्त टाइम पास
एक विरंगुळा असतो
इथे ना कोणाची मने जुळतात
वेडा होतो ........वेडा आहे .........आणि शेवटी वेडाच राहिलो .................
कधीच आयुष्याच, प्रेमाच, आणि मैत्रीच गणितच सुटलच नाही
वेडा होतो ........वेडा आहे .........आणि शेवटी वेडाच राहिलो .................
मोहन : २०-०५-२०१३