Monday, May 27, 2013

आठवणीतही तुझ्या मग पुन्हा मी रमून जातो

 
तुझ्याशी बोलताना
हरवून जातो स्वतःला
वाटत मनाला
जर का नसता हा दुरावा

तुझ्याशी बोलताना
आठवणीतही तुझ्या मग
पुन्हा मी रमून जातो
बघता बघता सकाळची ती सांज होते
आठवणीतही तुझ्या मग
पुन्हा मी रमून जातो

दुरावा तुझ्या माझ्या मधला
मनात एक काहूर उडवून जातो
दुराव्यात पण का मी
पुन्हा माझाच जगतो
आठवणीतही तुझ्या मग
पुन्हा मी रमून जातो

आस लागली सये
आता तुझ्या मिलनाची
साकारतील का स्वप्ने माझ्या मनाची ?
माहित आहे मला शक्य नाही ते
ठरवलेस तू तर अशक्य हि नाही ते
विचार करून
आठवणीतही तुझ्या मग
पुन्हा मी रमून जातो

भेटशील का एकदा
मन तुझे सावरून
काढशील का मला बाहेर
आठवणींच्या जगातून

मोहन - २८-०५-२०१३ वेळ - आताच

No comments:

Post a Comment