Friday, October 21, 2011

जीवनाची शिवण उसवण्याआधी ये..


किती दिवस असा राग धरणार माझ्यावर
किती अबोला धरणार आहेस
माझे प्रेम खरे की खोटे
हे आता मीचं समजु शकत नाहि........
पण....
माफ़ कर मला मी तुला समजु शकलो नाही
मला तुझी आठ्वण येतेय
तु मला बंद डोळ्याने दीसतेस
रात्र निघुन चालली आहे...
पहाट उगवतीला येत आहे
तुझ्या आठवणि वाढंत चालल्या आहे...........
तहानलेली धरती आकाशाकडे पाहत आहे........

किती दिवस असा राग धरणार माझ्यावर
किती अबोला धरणार आहेस......
हे जगचं क्षणभंगुर झाले आहे
तसा तुझा सहवासही..........
अजूनही माझ वेडं मन गाणं गातं ..
स्वप्नं रंगवत, तुझ्या आठवणींत स्वःताला हरवून बसतं ..
पण तू नाहीच बोललीस तर ..
या वेड्या मनाची समजूत कशी काढू मी ?
असे विचार मनात आल्यावर ,
डोळे पाणावतात , स्वप्नांची असंख्य शकले होतात..
सांग ना सखे
किती दिवस असा राग धरणार माझ्यावर
किती अबोला धरणार आहेस......
माझ्या मनाचा बांध तुटायच्या आधी ये..
अन उरात धडपडणारे श्वास थांबण्याआधी ये,
जीवनाची शिवण उसवण्याआधी ये..
लवकर ये..
मि तुझी वाट पाहत आहे...................

Tuesday, October 4, 2011

कसे सांगु तुला माझे तुझ्यावर आजही प्रेम आहे.........


कसे सांगु तुला माझे तुझ्यावर आजही प्रेम आहे.........
विसरुन सगळे मनाचे घाव
आजही तुझ्याच साठी जगत आहे
कसे सांगु तुला माझे तुझ्यावर आजही प्रेम आहे........
मरुन सुदधा "जिवंत" उभा आहे
तु जिथे सोडलेस त्याच जागी
तुझी वाट बघत उभा आहे
कसे सांगु तुला माझे तुझ्यावर आजही प्रेम आहे.........
हात कधी हातात येतील हे वाटलच नव्हतं,
हातातले हात सुटतील हेही वाटलच नव्हतं.
मला वाटतंय मी जगेन आता फार,
पण मला वाटतंय तसं होतंय कुठे.
कसे सांगु तुला माझे तुझ्यावर आजही प्रेम आहे.......
पूर्वी हसायला काहीही कारणं चालायची,
आता कारण असून सुद्धा हसत नाही.
कसे सांगु तुला माझे तुझ्यावर आजही प्रेम आहे.......
तुझ्यावर आजही प्रेम आहे.......
तुझ्यावर आजही प्रेम आहे.......

मोहन ०५/१०/२०११