किती दिवस असा राग धरणार माझ्यावर
किती अबोला धरणार आहेस
माझे प्रेम खरे की खोटे
हे आता मीचं समजु शकत नाहि........
पण....
माफ़ कर मला मी तुला समजु शकलो नाही
मला तुझी आठ्वण येतेय
तु मला बंद डोळ्याने दीसतेस
रात्र निघुन चालली आहे...
पहाट उगवतीला येत आहे
तुझ्या आठवणि वाढंत चालल्या आहे...........
तहानलेली धरती आकाशाकडे पाहत आहे........
किती दिवस असा राग धरणार माझ्यावर
किती अबोला धरणार आहेस......
हे जगचं क्षणभंगुर झाले आहे
तसा तुझा सहवासही..........
अजूनही माझ वेडं मन गाणं गातं ..
स्वप्नं रंगवत, तुझ्या आठवणींत स्वःताला हरवून बसतं ..
पण तू नाहीच बोललीस तर ..
या वेड्या मनाची समजूत कशी काढू मी ?
असे विचार मनात आल्यावर ,
डोळे पाणावतात , स्वप्नांची असंख्य शकले होतात..
सांग ना सखे
किती दिवस असा राग धरणार माझ्यावर
किती अबोला धरणार आहेस......
माझ्या मनाचा बांध तुटायच्या आधी ये..
अन उरात धडपडणारे श्वास थांबण्याआधी ये,
जीवनाची शिवण उसवण्याआधी ये..
लवकर ये..
मि तुझी वाट पाहत आहे...................

No comments:
Post a Comment