Monday, July 29, 2013

वाटल न्हवत अशी वागेल ती
कोणा एका साठी मला सोडेल ती
जगाचे काय हो पण माझी होती ती
वाटल न्हवत अशी वागेल ती
सोडून मला जाइल ती
जायचंच होत तर प्रेम का करायचं
का दाखवायची खोटी स्वप्ने
दाखवली खोटी स्वप्ने तिने
आणि रंगवली मी हि ती स्वप्ने
रंगवताना स्वप्ने मी हि भान हरपलो
स्वप्नांच्या दुनियेत जगू लागलो
स्वप्नातील राज महाल बांधू लागलो
त्या राजमहालाची ती राणी नि मी राजा
असे स्वतःला भासवू लागलो
चालल सर्व सुरळीत
आणि घातला नियतीने घात
जागा झालो स्वप्नातून
राणी ती गेली केंव्हाच उडून
स्वप्न माझे उधळून
राख रांगोळी करून
झालो निर्धास्त शेवट तो आयुष्याचा करावयास
पण अजूनही ती येईल अशीच आहे आस
वाटल न्हवत अशी वागेल
कोण एका साठी मला सोडेल

मोहन : २९-०७-२-१३

Friday, July 19, 2013

माझ मलाचं समजत नाही....

एखाद्याला सांगून पहिले तरी त्याला समजत नाही,
अगदी कविता केली तरीही त्याला उमगतच नाही...

अरे निदान शब्दांची नाहि तर.....कवितेची......
अरे निदान कवितेची नाहि तर.......नजरेची.....
कशाची तरी भाषा समजुन घे...........

बुडालोय रे तुझ्यात.......
तुझ्या प्रत्येक अदेत....
रोज तुलाचं पहावेसे वाटते....
रात्रि झोप येत नसते......
कधि तुझे खट्याळ हसणे हसवते....
तर कधि मौन रडवते......
असे रोज रोज घडते......
काय करु आणि काय नको करु
माझ मलाचं समजत नाही........................

अरे निदान शब्दांची नाहि तर.....कवितेची......
अरे निदान कवितेची नाहि तर.......नजरेची.....
अरे निदान नजरेची नाहि तर........माझ्या भावनांची...........
कशाची तरी भाषा समजुन घे...........

ह्रुदयाचा प्रत्येक आवाज तुलाच साद घालतोय.....
प्रत्येक सादेत तुलाच शोधतोय.....
कर स्विकार माझ्या भोळ्या प्रेमाचा....
प्रेमातील सुंदर दुनियेचा.....
करशिल ना स्विकार????????

काय करु आणि काय नको करु
माझ मलाचं समजत नाही......
माझ मलाचं समजत नाही....

तुझ्यावर आजही प्रेम आहे.......

कसे सांगु तुला माझेही तुझ्यावर आजही प्रेम आहे.........
विसरुन सगळे मनाचे घाव
आजही तुझ्याच साठी जगत आहे
कसे सांगु तुला माझे तुझ्यावर आजही प्रेम आहे........
मरुन सुदधा "जिवंत" उभा आहे
तु जिथे सोडलेस त्याच जागी
तुझी वाट बघत उभा आहे
कसे सांगु तुला माझे तुझ्यावर आजही प्रेम आहे.........
हात कधी हातात येतील हे वाटलच नव्हतं,
हातातले हात सुटतील हेही वाटलच नव्हतं.
मला वाटतंय मी जगेन आता फार,
पण मला वाटतंय तसं होतंय कुठे.
कसे सांगु तुला माझे तुझ्यावर आजही प्रेम आहे.......
पूर्वी हसायला काहीही कारणं चालायची,
आता कारण असून सुद्धा हसत नाही.
कसे सांगु तुला माझे तुझ्यावर आजही प्रेम आहे.......
तुझ्यावर आजही प्रेम आहे.......
तुझ्यावर आजही प्रेम आहे.......

मि तुझी वाट पाहत आहे...................

किती दिवस असा राग धरणार माझ्यावर
किती अबोला धरणार आहेस
माझे प्रेम खरे की खोटे
हे आता मीचं समजु शकत नाहि........
पण....
माफ़ कर मला मी तुला समजु शकलो नाही
मला तुझी आठ्वण येतेय
तु मला बंद डोळ्याने दीसतेस
रात्र निघुन चालली आहे...
पहाट उगवतीला येत आहे
तुझ्या आठवणि वाढंत चालल्या आहे...........
तहानलेली धरती आकाशाकडे पाहत आहे........

किती दिवस असा राग धरणार माझ्यावर
किती अबोला धरणार आहेस......
हे जगचं क्षणभंगुर झाले आहे
तसा तुझा सहवासही..........
अजूनही माझ वेडं मन गाणं गातं ..
स्वप्नं रंगवत, तुझ्या आठवणींत स्वःताला हरवून बसतं ..
पण तू नाहीच बोललीस तर ..
या वेड्या मनाची समजूत कशी काढू मी ?
असे विचार मनात आल्यावर ,
डोळे पाणावतात , स्वप्नांची असंख्य शकले होतात..
सांग ना सखे
किती दिवस असा राग धरणार माझ्यावर
किती अबोला धरणार आहेस......
माझ्या मनाचा बांध तुटायच्या आधी ये..
अन उरात धडपडणारे श्वास थांबण्याआधी ये,
जीवनाची शिवण उसवण्याआधी ये..
लवकर ये..
मि तुझी वाट पाहत आहे...................

तू माझी अन मी तुझा

तू माझी अन मी तुझा
किती मस्त मेळ होता........
उशिरा समजले माला
हा तुझा एक खेळ होता
रचिले स्वप्न सुखि संसाराचे मी......
निर्मळ प्रेमळ स्वप्नातील संसार माझा
उशिरा समजले माला
उध्वस्त करण्याचा तुझा डाव होता.........
तू माझी अन मी तुझा
किती मस्त मेळ होता.........
मनं माझे विरहाच्या अग्निमध्ये
आजही जळत आहे
उशिरा समजले माला
अग्निमध्ये ढकलण्याचाच तुझा बेत होता........
जे झाले ते झाले
गेलिस जरी सोडुन मला
माझ्या आठवणिंना कशी सोडशील.......
जेंव्हा त्या सतवतील तेंव्हा
कळेल तुला.
तुझ्याचं बरोबर शेवट करण्याचा
माझा विचार होता...........
**** कसे समजावू वेड्या मनास****

कसे समजावू वेड्या मनास
उगाच राहुनी वाटते त्याला
ती पुन्हा येयील एकट्या पडलेल्या
मनास जवळ घेइल
कसे समजावू वेड्या मनास
आहे तो फक्त एक भास
आहे ते फक्त एक स्वप्न
आहे ती अंतरीची आस
गेली सोडूनी एकटी तुला
नजर ती ना पारखू शकली
ओढ ती ना जणू शकली
सोडले आसमंतात तुला
वेचण्यास विरहाचे काटे तुला
कसे समजावू वेड्या मनास............
कसे समजावू वेड्या मनास...........

मोहन : १९-०७-२०१३
 

***** चीतेवरील देहास पाहायलाच हवं*****

***** चीतेवरील देहास पाहायलाच हवं*****

आता तर
तुला यायलाच हवं
चीतेवरील देहास
पाहायलाच हवं ........
मागणी प्रेमाची
तुज करुनी
पडला निपचित देह माझा
आली न दया तुज प्रेमाची
फुटला न अंकुर तुज प्रेमाचा
विसावला आता
देह माझा ...................
आता तर तुला यायलाच हवं
चीतेवरील देहास पाहायलाच हवं .....
चीतेवरील देहास पाहायलाच हवं .........

मोहन : १९-०७-२०१३
 

Monday, May 27, 2013

आठवणीतही तुझ्या मग पुन्हा मी रमून जातो

 
तुझ्याशी बोलताना
हरवून जातो स्वतःला
वाटत मनाला
जर का नसता हा दुरावा

तुझ्याशी बोलताना
आठवणीतही तुझ्या मग
पुन्हा मी रमून जातो
बघता बघता सकाळची ती सांज होते
आठवणीतही तुझ्या मग
पुन्हा मी रमून जातो

दुरावा तुझ्या माझ्या मधला
मनात एक काहूर उडवून जातो
दुराव्यात पण का मी
पुन्हा माझाच जगतो
आठवणीतही तुझ्या मग
पुन्हा मी रमून जातो

आस लागली सये
आता तुझ्या मिलनाची
साकारतील का स्वप्ने माझ्या मनाची ?
माहित आहे मला शक्य नाही ते
ठरवलेस तू तर अशक्य हि नाही ते
विचार करून
आठवणीतही तुझ्या मग
पुन्हा मी रमून जातो

भेटशील का एकदा
मन तुझे सावरून
काढशील का मला बाहेर
आठवणींच्या जगातून

मोहन - २८-०५-२०१३ वेळ - आताच

Thursday, May 23, 2013

एकटेपणा येतो तेंव्हा


एकटेपणा येतो तेंव्हा
तो असा येतो कि
जसे वाळवंटातले वादळ
येताना एकटा येतो
आणि जाताना सर्व काही घेवून जातो
सोडून जातो फक्त त्या आठवणी
मनाला बोचणार्या, मनाला छेडणार्या
मनाला असह्य वेदना देणाऱ्या
एकटेपण येतो तेंव्हा असा येतो कि
अथांग समुद्रावर पसरलेली धुक्यांची चादर
समोर सर्वकाही असताना काहीच न दिसणारा
एकटेपण येतो तेंव्हा असा येतो कि
उरतो फक्त भास
ती जवळ असण्याचा
होतो फक्त त्रास
ती सोडून गेल्याचा
एकटेपण येतो तेंव्हा असा येतो कि
देतो फक्त दुखाचे सावट ......
फक्त दुखाचे सावट........
दुखाचे सावट........

मोहन :- २३-०५-२०१३ वेळ : आताच

Monday, May 20, 2013

एक कुतूहल ती येण्याच .........



 











 एक कुतूहल ती येण्याच .........
आज ती एक महिन्या नंतर येणार होती
खूप खुश होतो कारण एक महिना ती न्हवती
तिच्याशी बोलायला मन खूप आतुर झाले होते
कारण एक कुतूहल ती येण्याच ............
आणि आज तो दिवस आला
ती आज मला ओन्लायीन भेटणार
मग आम्ही खूप खूप गप्पा मारणार
कारण एक कुतूहल ती येण्याच ............
मनात तर इतके प्रश्न होते कि विचारायला नको
कधी आलीस ?
काय काय केलेस महिनाभर ?
मला एक तरी फोन/मेसेज का नाही केलास ?
माझी आठवण आली का?
असे खूप काही प्रश्न
कारण एक कुतूहल ती येण्याच ............
पण ..................
आज ती आली आणि .........
हाय बाय इतकेच ?????
कसा आहेस हा देखील प्रश्न नाही !!!
चल जाते बाय नंतर बोलू खूप काम आहे
असे बोलून निघूनही गेली
एखादा भरलेला फिश टयांक
कोणी दगड मारून मारून फोडावा
तसा खळळळळळ करून तुटलो
त्या पाण्यासोबत मनातील सर्व प्रश्न वाहून गेले
राहिलो पुन्हा एकटाच
कारण एक कुतूहल ती येण्याच ............
नसतच तुटल मन माझ
जर का मी इतकी ती येण्याची आस लावलीच नसती
वेडाच होतो मी माहीतच न्हवत 
ओन्लायीन मैत्री फक्त टाइम पास
एक विरंगुळा असतो
इथे ना कोणाची मने जुळतात
वेडा होतो ........वेडा आहे .........आणि शेवटी वेडाच राहिलो .................
कधीच आयुष्याच, प्रेमाच, आणि मैत्रीच गणितच सुटलच नाही
वेडा होतो ........वेडा आहे .........आणि शेवटी वेडाच राहिलो .................
मोहन : २०-०५-२०१३