Tuesday, April 26, 2011


मनमोकळं हसायचीही भिती


काय करु आता मि
मनमोकळं हसायचीही भिती
असणारंच ना कारण
केले होते प्रेम तुझ्यावर जगाचा विचार न करता
सोड्ले होते घर दार मी तुझ्यासाठी
तोड्ले होते सगळे नाते संबंध मी तुझ्यासाठी
वाट्लं होत तु असाविस माझि आणि फ़क्त माझि
होतिसहि माझि तु
पण वरच्या मनाने
मला काय माहित कि तु माझ्या नव्हे
तुझ्या घरच्यांचा आणि समाजाचा पहिला विचार करशिल
आणि सोडुन जाशिल
आज सगळे जग हसतेय रे माझ्यावर
काय करु आता मि
मनमोकळं हसायचीही भिती
आणि रडायचीहि भिती



मोहन बाराथे २०-११-२०१०

No comments:

Post a Comment