Tuesday, April 26, 2011


चंद्र तिथला आणि इथला सारखाच आहे



चंद्र तिथला आणि इथला सारखाच आहे
फ़रक फ़क्त इतकाचं आहे
त्या चंद्राजवळ चांदणी आहे......
कीति नशिबवान आहे तो
त्याच्या जवळ त्याचि चांदणी आहे.........
आणि
ह्या चंद्राची चांदणी हरवली आहे.......
माझि चांदणी कशी हरवलि कुणास ठावुक....
किती तरी रात्रि गेल्या आठवणित......
ऎका कडेला उभा राहुन मी
रोज नभ पहात होतो..........
सम्पुर्ण नभ फीरुन परत मी
तीथेच उभा रहात होतो..........
बराच वेळ गेला
हे असंच चालु राहीलं
शेवटी हा चंद्र शांत झाला
त्या नभाला पाहु लागला..........
आणि पाहतो तर काय.....
तो चद्र ह्याला हसु लागला........
हसणारचं त्या चंद्राजवळ त्याची चांदणी आहे......
आणि
ह्या चंद्राची चांदणी हरवली आहे.......
पण तरीहि
चंद्र तिथला आणि इथला सारखाच आहे
फ़रक फ़क्त इतकाचं आहे
त्या चंद्राजवळ स्वताः चे ढग आहे.........
ह्या चंद्राजवळ सिगारेट चे ढग आहे......
चंद्र तिथला आणि इथला सारखाच आहे..................
चंद्र तिथला आणि इथला सारखाच आहे.......................



मोहन बाराथे ०१-१२-२०१०

No comments:

Post a Comment