जाणवली आज ती गुलाबी थंडी.........
लागली चाहुल तु असण्याची..........
काही वेळ स्तब्ध थांबलो आणि
जाणवले तो एक भास..... तु असण्याचा....
इतक्यात तुझ्या श्वासांचा सुगंध आला....
दरवळत माझ्या आवती-भोवती फ़िरत राहीला...
खुप खुप आठवणी घेवुन आला.....
मग डोळे जरा मिटुन पाहिले....
सरलेल्या क्षण आठ्वुन पाहिले....
त्या आठवणीत चांदण्या सा-या मोजुन पाहील्या....
चांदण्या रात्रित घेतलेल्या शपथेचा शब्द न शब्द आठवून पाहिला......
तुझ्या श्वासांचा सुगंध आला....
दरवळत माझ्या आवती-भोवती फ़िरत राहीला.....
मग त्या आठवणित नदि किनारी जाउन बसलो
कित्येकदा किना-याला मिठित घेतले...आणि
परतना-या लाटेला निराशेने पाहीले......
ऎक हंबरडा फ़ोडला.......
तुला साद घातली....
माझ्या आवती - भोवती फ़िरणारं
तुझ अस्तित्व जाणवलं
तुझ्या श्वासांचा सुगंध आला....
दरवळत माझ्या आवती-भोवतीच फ़िरत राहीली..
मोहन बाराथे ०७-१२-२०१०

No comments:
Post a Comment