Wednesday, September 28, 2011

आलिस परत कि पुन्हा जावु नकोस............


दरवेळी भेटायला येतांना
तुझा बहाणा नवा असतो...
तू परत जाताना
जीव माझा क्षणो-क्षणी तुटतो.
येताना मात्र निवांत येतेस
पण जातानाचं तुला का घाई होते........
तुला काय माहित
तुझी वाट पाहताना मला काय होते......

किती? वाट बघावी तुझया या चाहुलीची,
नको बघू अंत आता माझया आशेची.
दूर दूर राहून वेडापिसा झालो आहे,
सहन नाही होत,
तुझया प्रेमात वेडा झालो आहे.
प्रत्येक पाउली तूच असावी,
अशी इच्छा आहे आता.
तू परत जाताना
जीव माझा क्षणो-क्षणी तुटतो.

डोळे मिटून तूच दिसते,
डोळे उघडून पण तुझीच आस असते.
जेव्हा माझी पापणी लावते,
त्याक्षणी तु इथे नसल्याची
जाणीव होते.
तू परत जाताना
जीव माझा क्षणो-क्षणी तुटतो.
आता फ़क्त एकचं आस आहे
आलिस परत कि पुन्हा जावु नकोस............

No comments:

Post a Comment