Wednesday, October 31, 2012

मजला एकदा भेटशील का तू ?

कल्पनेतली परी तू
सत्यात तुला पाहतोय
तेच डोळे ........ तेच हसू ..........
जशी असावी स्वप्नपरी तू .....
जशी असावी चंद्राची चांदणी
तशी माझी मन मोहिनी तू .........
जशी उन्हाळ्यात आस गारवाची..........
जशी रातीला ओढ चंद्राची .....
जशी नदीला ओढ समुद्राची ............
तशीच माझ्या मनाला ओढ तुझ्या भेटीची .........
कल्पनेतली परी तू
सत्यात तुला पाहतोय
पाहून तुला वाटते विचारावे
मजला एकदा भेटशील का तू ?
मजला एकदा भेटशील का तू ?

मोहन : ३१-१०-२०१२

No comments:

Post a Comment